रत्नागिरी, (आरकेजी) : घरगुती भांडणावरून संतप्त झालेल्या सासुने सुनेला चाकूने भोसकून ठार मारल्याची घटना आज सकाळी चिपळूण तालुक्यात घडली. वालोपे गावातल्या देऊळवाडीत परी प्रशांत कारकाळे आपल्या कुटुंबासह राहते. मुळचे लातूरमधील हे कुटुंब कामानिमित्त वालोपे इथे आले आहे. आज सकाळी सकाळी परिचे सासू रेणूकासोबत काही कारणावरून भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात रेणूकाने सूनेच्या छातीत चाक़ू खुपसला आणि सपासप वार केले. यामध्ये परीचा जागीच मृत्यू झाला. चिपळूण पोलिसांनी सासू रेणूका हिला अटक केली आहे.