मुंबई : आजीविका ब्युरोच्या साकीनाका केंद्राद्वारे कामगार दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या दरम्यान बांधकाम, लोडींग अन लोडिंग, फॅक्टरी आणि घरकाम या क्षेत्रात काम करणारे 50 कामगार उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘वी द पीपल’ ग्रुप चे सदस्य सिद्धेश यांनी कामगारांना संविधान व कामगार हक्क याविषयी मार्गदर्शन केले.
इंडिया लेबरलाईन कडून विशाल कांबळे यांनी मजदुर संघर्ष आंदोलन व संघटित होण्याचे महत्त्व याविषयी चर्चा केली. कार्यक्रमाचा समारोप कलाकार देवव्रत यांनी सर्वांसमवेत कामगार हक्कांवर आधारित गाणी गाऊन केला.