मुंबई : भारताची आघाडीची प्रीमियम मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदाता कंपनी कियाने देशभरातील कियाच्या ग्राहकांना हाय-टेक, स्मार्ट नेव्हीगेशन प्रदान करण्यासाठी मॅप माय इंडियाशी हातमिळवणी केल्याचे जाहीर केले आहे. माय किया आणि किया कनेक्ट मंचांशी एकीकृत केलेले ही धोरणात्मक भागीदारी वापरकर्त्यांना आत्मविश्वासाने प्रवास करण्यासाठी सक्षम करणारी अचूक लोकेशन सेवा आणि व्यापक स्थान शोध वैशिष्ट्यासह वापरकर्त्यांसाठी ड्रायव्हिंगच्या अनुभवास पुन्हा व्याख्यायित करते. या मंचावरील चारचाकी विशिष्ट पॉइंट ऑफ इंटरेस्ट सर्च ४५० वर्गांमध्ये व्याप्त असून विक्रेते आणि सर्व्हिस सेंटर्स, पेट्रोल पंप, हॉस्पिटल, हॉटेल्स, उपाहारगृहे आणि इतर महत्त्वाच्या सेवा सहज शोधण्यास मदत करतो.
शिवाय, ड्रायव्हर्सना ड्रायव्हिंग करत असताना स्पीड लिमिट इशारे, रियल टाइम अडचणीच्या सूचना (उदा. पाणी साचून राहणे, रस्त्याचे काम सुरू असणे, ट्राफिक जॅम, इ.) मिळतील आणि आपल्या आवाजाने नेव्हीगेशन करण्याची सुविधा देखील मिळेल. ही वैशिष्ट्ये आणि त्याला पूरक असे डायनॅमिक रियल टाइम सुरक्षा इशारे यामधून आपल्या ग्राहकाची सुरक्षा आणि टेक-सक्षम सुधारित ड्रायव्हिंग अनुभव प्रदान करण्याची कियाची निष्ठा पुन्हा पुन्हा दिसून येते.
किया इंडियाचे चीफ सेल्स ऑफिसर श्री. म्युंग-सिक सोन म्हणाले, “कियामध्ये आम्ही सतत अशी भागीदारी करण्याच्या शोधात असतो, जी आमच्या इनोव्हेशन आणि ग्राहक संतोषाच्या वचनबद्धतेशी मिळती जुळती असेल. मॅप माय इंडियाशी केलेल्या भागीदारीमुळे आमच्या नव्या जमान्याच्या ग्राहकांना ड्रायव्हिंगचा आणखी सुलभ अनुभव देण्यासाठी समर्पित असा टेक-प्रगत ब्रॅंड म्हणून आमचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.