चिपळुण :रत्नागिरी जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष व संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्था, खेर्डीचे चेअरमन सुभाष गुडेकर यांना नुकताच राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार कुंभार समाज उत्कर्ष समितीच्या वतीने मुंबई येथे प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त त्यांचा चिपळूण तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यासाठी संत गोरा कुंभार विकास मंडळ, खेर्डी व संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्था, चिपळूण यांच्या संयुक्त मासिक सभेत अभिनंदनाचा ठराव करण्यात आणि ज्येष्ठ समाज बांधव सुदामशेठ साळवी व हरिचंद्र गुडेकर यांनी शाल ,श्रीफळ व बुके देऊन गुडेकर यांना सन्मानित केले.
तालुकाध्यक्ष प्रकाशशेठ साळवी यांनी गुडेकर यांच्या कार्याचा गौरव केला आणि तरुणांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करावे असे सांगितले . सुनिल उर्फ नाना टेरवकर, सुनिल निवळकर, प्रदिप शिरकर, अमोल पिरधनकर, तनाळीचे माजी सरपंच महेश गुडेकर व पत्रकार राकेश गुडेकर यांची गौरवपर भाषणे झाली.
हा सत्कार माझा एकट्याचा नसून ज्या समाज बांधवांनी मला जबाबदारी दिली व जे माझ्या हाकेला ओ देऊन सदैव हजर राहतात त्या सर्वांचा आहे/ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत समाजकार्य सुरू ठेवेन, असे मनोगत सुभाष गुडेकर यांनी व्यक्त केले .
मंडळाचे वरिष्ठ उपाध्यक्ष तुकारामशेठ साळवी, उपाध्यक्ष जनार्दन मालवणकर, सचिव सोमा गुडेकर, खजिनदार तुकारामशेठ बुरबाडकर, दिपक साळवी, मनोहर वाडकर, शांताराम शिरकर, लक्ष्मण साळवी, उदय पडवेकर, संजय गुडेकर, प्रकाश शिरकर, रविंद्र साळवी, सतीश साळवी, संजय कुंभार, अशोक वहाळकर, गणेश गुडेकर, पतसंस्था संचालक रविंद्र शिरकर, धोंडू धामणकर, सिताराम टेरवकर, बबन पडवेकर , तुकाराम साळवी, मनोहर बुरबाडकर, संचालिका सुमन साळवी, सुप्रिया कुंभार व तज्ञ संचालक रघुनाथ कुंभार आदी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते .