
संगमेश्वर-देवरुख येथील शिबिराला अस्थि रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिबिराच्या नियोजनाबद्दल रुग्णांनी मानले वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे मानले आभार
चिपळूण — चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आयोजित चिपळूण व देवरुख – संगमेश्वर येथील रुग्णांसाठी अस्थिरुग्ण तपासणी व उपचार शिबिराला संगमेश्वर येथे दिनांक २२ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. या शिबिराला देवरुख-संगमेश्वरमधील अस्थी रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराच्या नियोजनाबद्दल येथील अस्थि रुग्णांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे आभार मानले. तर आज बुधवार दिनांक २४ व गुरुवार दिनांक २५ रोजी चिपळुनात चिपळूण नागरी पतसंस्थेच्या ‘सहकार भवन’ येथे अस्थि रुग्ण शिबिर होणार आहे, अशी माहिती वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रशांत यादव मित्र मंडळातर्फे अस्थि रुग्ण तपासणी शिबिर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा ८०० रुग्णांनी लाभ घेतला होता. त्याचप्रमाणे यावर्षी देखील या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या शिबिरासाठी जोधपूर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. नंदकिशोर पाराशर, डॉ. हेमंत कुमार पाराशर, डॉ. गौरव पाराशर, डॉ. राकेश पाराशर रुग्णांची तपासणी करून उपचार करीत आहेत.
देवरुख-संगमेश्वर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराचा देवरुख -संगमेश्वर येथील अस्थी रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिराबद्दल समाधान व्यक्त करत वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अस्थि रुग्णांनी आभार मानले.
तर बुधवार दिनांक २४ व गुरुवार दिनांक २५ रोजी चिपळूणात चिपळूण नागरी पतसंस्थेच्या सहकार भवनमध्ये अस्थि रुग्ण तपासणी व उपचार शिबिर पार पडणार आहे. सकाळी ९ वाजता या शिबिराचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल, अशी माहिती वाशिष्टी डेरी प्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.