रत्नागिरी : चिपळुण तालुक्यातील शिरळ गट विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनिल टेरवकर व उपाध्यक्ष पदावर दिलीप देसाई यांची बिनविरोध निवड झाली. याबद्द्ल टेरवकर आणि देसाई यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. निवडणूक अधिकारी प्रियांका माने यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.
मालघर,पाचाड ,वैजी, रेहेळ भागाडी, कोंढे, शिरळ व खोपड या सात गावात संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. संस्थेचे एक हजार सभासद असुन दिड कोटींचे कर्ज व्यवहार आहेत. बावीस लाखांचे भाग भांडवल तर खेळते भागभांडवळ एक कोटी ऐशी लाख आहे. मागील सलग तीन वर्ष ऑडिट वर्ग “अ ” मिळत आहे . यावर्षी सभासदांना चौदा टक्के लाभांश वाटप करण्यात आला. संजय भगवान खेतले गेली बारा वर्ष सचिव म्हणून यशस्वीपणे काम करत आहेत .
जानेवारी २०१७ मध्ये या संस्थेच्या सन २०१६-१७ ते २०२१-२२ पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. आर्थिक व शेतकरी विकास सोसायटीमध्ये निवडणूक नको या हेतूने तत्कालीन संचालक मंडळाने निवडणुकीपूर्वी सभासदांची बैठक घेऊन बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला. सभासदांनी कोणतेही राजकारण न आणता प्रस्तावाला होकार देऊन संस्थेच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा जपली . सर्वसाधारण मतदारसंघातून सुनिल गणपत टेरवकर, विजय गोपाळ वाजे , राजेंद्र रघुनाथ पवार, तुकाराम गंगाराम बामणे, अनंत पांडुरंग ठसाळे, दत्तात्रय विष्णु करंजकर, दिलिप शंकर देसाई व विनायक बबन भुवड यांची निवड झाली. महिला राखीव मधून विजया अनंत मोरे व श्रध्दा सदाशिव घोले यांची निवड झाली. अनुसुचित जाती मतदारसंघातून रविंद्र काशिराम मोहिते यांची निवड झाली. इतर मागास राखीव मतदारसंघातून दिलिप महादेव कुळे तर भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून अनिलशेठ मारुती चिले या सर्वांची निवड बिनविरोध करण्यात आली .
नवनियुक्त अध्यक्ष सुनिल टेरवकर उच्चशिक्षित असुन अनेक सहकारी संस्थांशी निगडित आहेत. तर उपाध्यक्ष दिलिप देसाई हे माजी सैनिक आहेत.