
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर नारळी पोर्णिमा आज उत्साहात साजरी करण्यात आली. समुद्राला शांत करण्यासाठी कोळी बांधवांनी समुद्रात नारळ सोडून समुद्राला शांत होण्याची विनंती केली. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आनंदाचे वातावरण पहायला मिळाले.
1 ऑगस्टपासून जरी मासेमारी सुरु झाली असली, नारळी पौर्णिमेनंतरच खऱ्या अर्थाने मासेमारी हंगामाला सुरुवात होते. त्यामुळे दर्यावर स्वार होण्यासाठी मच्छिमार दर्याला शांत होण्याची विनंती करतो. कोकणातल्या खारवी समाजात आज नारळी पोर्णिमेचं महत्व विशेष आहे. टाळ आणि मृदुंगाच्या तालावर रत्नागिरीतील कासारवेलीमधील खारवी समाज समुद्रावर येतो. समुद्राला सोनेरी नारळ अर्पण करून समुद्राला शांत होण्याची विनंती केली जाते. जूनपासून पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत होण्यासाठी असंख्य खारवी बांधव समुद्राच्या किनाऱ्याला येतात. भजनाच्या तालावर हे बांधव समुद्राची पुजा करतात. नटलेल्या खारवी महिला समुद्राची पुजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात. खारवी समाजाची नारळी पोर्णिमेला कित्येक वर्षांची हि परंपरा पहायला मिळते.
![]() |
ReplyForward
|