मुंबई, (निसार अली) : महाराष्ट्र माझा युवा प्रतिष्ठानच्यावतीने ’सन्मान मुंबई पोलिसांचा, अभिमान आमच्या राखीचा’ या मोहिमेअंतर्गत रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. पोलीस दलातील कर्तव्यदक्ष कर्मचारी व अधिकार्यांना यावेळी राखी बांधण्यात आल्या. 26 ऑगस्ट रोजी गोरेगाव पूर्व येथील वनराई पोलीस ठाणे , गोरेगाव वाहतूक पोलीस ठाणे,आणि दिंडोशी पोलीस ठाणे व अग्निशमन दलाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची आरती ओवाळून राखी बांधून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देत त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र माझा युवा प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा सुनीता राजेंद्र शिरसाट, अध्यक्ष अजित पाटील, उपाध्यक्ष संदीप भोसले, संदीप घोलप, पौर्णिमा मिश्रा, कांचन नाईक, सई केळकर, मकबूल शेख, गौरव बोरले आणि इतर महिला आणि पुरुष कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले.