मुंबई,दि. 1ः महाराष्ट्र घडविण्यासाठी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणाऱ्या 106 हुतात्म्यांना कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी महाराष्ट्र दिनी अभिवादन करण्यात आले. दरम्यान, शहीद सीताराम गणपत म्हादे यांनाही यावेळी आदरांजली वाहण्यात आली.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. यावेळी बलिदान दिलेेेेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. सिताराम गणपत म्हादे हे यावेळी हुतात्मा झाले. कोकण विभाग म्हादे परिवार संलग्न कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठानकडून दरवर्षी महाराष्ट्र दिनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाते. यंदाही राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, खेड, रायगड आदी तालुक्यातील म्हादे बंधूनी उपस्थित राहून शहीद म्हादे यांना अभिवादन केले.