नवी दिल्ली : इंडिया यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेडने एफझेड मालिकेमधील एफझेड25 ही नवी बाईक बाजारात दाखल केली. पुलमन हॉटेलमध्ये झालेल्या समारंभात प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम याने तिचे अनावरण केले. खास युवावर्गाला समोर ठेवून या बाईकची निर्मिती करण्यात आली आहे.
एफझेड25 “बॅलिस्टिक ब्लू”, “वॉरिअर व्हाइट” व“नाइट ब्लॅक” या रंगात उपलब्ध असेल. फेब्रुवारीच्या सुरुवातीला बाईक बाजारात उपलब्ध होईल, असेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. नवे मॉडेल अद्ययावतरित्या विकसित करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. या मॉडेलमध्ये बीएस IV एमिसन प्रमाणके समाविष्ट केली आहेत. एलईडी हेडलाइट, एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हाताच्या हालचालींप्रमाणे फिरणारे मडगार्ड, एमटी सीरिज बाइकसारखे दिसणारे स्पोक डिझाइन असलेली चाके व रेसिंग स्टाइलप्रमाणे फूटपॅड (रिअर सीट)यामुळे एफझेड मालिकेतील टॉप-एंड मॉडेल असलेली ही बाइक लक्ष खिळवून ठेवते. तसेच दैनंदिन वापरासाठी ही बाइक अतिशय उपयुक्त आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.
बाईकची वैशिष्ट्ये
* हलक्या फ्रेमवर (148 किलो) नव्याने डिझाइन केलेले एअर-कूल्ड,
* 249 सीसी, 4-स्ट्रोक, एसओएचसी
* 2-व्हॉल्व्ह, सिंगल-सिलिंडर, हाय-टॉर्कफ्युएल-इंजेक्टेड इंजिन