नवी दिल्ली : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. निवडणुका या लोकशाहीचा सोहळा आहेत. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदारांनी आपला हक्क बजावलाच पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यांनतर मतदार म्हणून नोंदणी करा, असेही ते म्हणाले. देशामध्ये २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो.
पंतप्रधानांनी निवडणूक आयोगालाही शुभेच्छा दिल्या. लोकशाही व्यवस्थेत आयोग बजावत असलेल्या महत्वपूर्ण भूमिकेला सलाम करतो, असेही ते म्हणाले. निवडणुका या नागरिकांच्या इच्छा पोहोचवण्याचे काम करतात, जे लोकशाहीत महत्वाचे आहे, याकडे त्यांनी मतदारांचे लक्ष वेधले.