मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अंगीकृत संघटना असणार्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी नुकतीच विक्रोळीतील पदाधिकार्यांची नेमणूक केली. मनसे सचिव आणि मनविसे उपाध्यक्ष सचिन मोरे यांनी विक्रोळी प्रभाग क्र. ११८ व प्रभाग क्र. ११९ करीता उपविभाग अध्यक्षपदी विशाल कांबळे यांची तर प्रभाग क्र. ११७ मध्ये शाखा अध्यक्षपदी अक्षय मुळे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. विशाल कांबळे आणि अभय मुळे यांना नियुक्तीपत्र देताना सचिन मोरे यांनी प्रमाणिकपणे पक्षकार्य करण्याचे सांगितले. आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार संघटनेसाठी काम करू, असे नवनियुक्त पदाधिकार्यांनी यावेळी सांगितले. मनविसे विधानसभा अध्यक्ष प्रशांत परुळेकर, उपविभाग सचिव प्रतिश बो-हाडे, मनसे माजी उपशाखाध्यक्ष विक्रम कदम उपस्थित होते.