नवी दिल्ली : साऊथ वेस्टर्न कमांडच्या “ स्ट्राईक वन” कॉर्प्सनी आज सलग दुसऱ्या दिवशी अंदमान आणि निकोबार बेटांवर जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या प्रगत ब्रह्मोस ब्लॉक 3 ची यशस्वी चाचणी केली. या सलग प्रक्षेपणामुळे या क्षेपणास्त्राची अचूक वेध घेण्याच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. कालही याच ठिकाणी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.
ब्रह्मोस एलएसीएमच्या ब्लॉक 3 आवृत्तीची ही सलग पाचवी यशस्वी चाचणी होती. अन्य कोणत्याही क्षेपणास्त्राला ही कामगिरी करता आलेली नाही