सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज तिस-या दिवशी जिल्हा परिषद गटासाठी ७ तर पंचायत समिती गणासाठी ९ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.
तालुकानिहाय शुक्रवारी दाखल झालेली नामनिर्देशनपत्रे : जिल्हा परिषद गटासाठी देवगड २, मालवण २, कुडाळ २, दोडामार्ग १ अशी एकूण ७ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. तर पंचायत समिती निर्वाचक गणासाठी देवगड १, मालवण १, कुडाळ ७ या प्रमाणे एकूण ९ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. आज अखेर जिल्हा परिषद गटासाठी एकूण ८ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.