नवी मुंबई : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज ८२.०३ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९४.७२ टक्के झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली आणि कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही .
जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी :
आकडेवारी टक्क्यांमध्ये
ठाणे- ७१.५०
पालघर- ८७.१७
रत्नागिरी- ९१.१७
रायगड- ८८.९०
सिंधुदुर्ग- ९४.७२