मुंबई : मध्य-महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर कोकण-गोवा व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. २८ जानेवारीपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदीया येथे ११.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस) खालीलप्रमाणे:
मुंबई (कुलाबा) २२.५, सांताक्रुझ १९.४, अलिबाग २०.०, रत्नागिरी २०.६, पणजी (गोवा) २१.८, डहाणू १९.३, भिरा २१.०, पुणे १३.२, अहमदनगर १३.२, जळगाव १४.८, कोल्हापूर १८.१, महाबळेश्वर १६.१, मालेगाव १४.४, नाशिक १३.४, सांगली १६.४, सातारा १४.९, सोलापूर १७.६, औरंगाबाद १५.६, परभणी १५.०, नांदेड १७.०, अकोला १८.०, अमरावती १५.२, बुलढाणा १८.०, ब्रह्मपुरी १५.५,चंद्रपूर १५.८, गोंदिया ११.५, नागपूर १४.१, वाशिम १७.२, वर्धा १५.५, यवतमाळ १५.४