
नवी दिल्ली : इस्रोने आज पीएसएलव्ही-सी३८ या त्याच्या प्रक्षेपकातून ७१२ किलोग्रॅम वजनाचा कार्टोसॅट-२ मालिकेतील ३१ नॅनो उपग्रह प्रक्षेपित केले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएलएलव्हीचे हे सलग ३९ वे यशस्वी प्रक्षेपण आहे.
नियोजनानुसार पीएसएलव्ही-३८ प्रक्षेपण स्थळावरून ९ वाजून २९ मिनिटांनी प्रक्षेपण झालं. २ भारतीय उपग्रहांवर १५ देशांच्या ३१ नॅनो उपग्रहांचा यामध्ये समावेश आहे. या प्रक्षेपणानंतर पीएसएलव्ही द्वारा प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांची संख्या ४८ झाली आहे.
१५ देशांच्या ३१ उपग्रहांसह यशस्वी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन केले. आम्हाला तुमचा अभिमान आहे”, असे पंतप्रधान म्हणालेआहेत.














