मुंबई, (निसार अली) : संवेदनशील परिसर अशी ओळख असणार्या मालवणीत प्रत्यक्षात धार्मिक एकोपा नांदतो. पवित्र रमजान महिन्यात गेट क्रमांक ६ येथील साई सावली मंदिरात एकोपा पहायला मिळाला. मंदिराचे कार्यवाह रविंद्र डोंगरे यांनी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी साजरी केली. परिसरातील सर्व धर्मीय महिला आणि पुरुष मंदिरात एकत्र आले. आणि त्यांनी इफ्तार करुन रोजा सोडला. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक फटांगरे तसच अनेक अधिकारी आणि कर्मचारी यावेळी सहभागी झाले. इफ्तार पार्टीत धार्मीक सलोखा पाहायाल मिळाला.