मुंबई, (निसार अली) : जातीय द्वेषातून दिवंगत प्रा. अरुण कांबळे यांच्या कुटुंबावर १२,१३ आणि १४ मार्च या दिवशी हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी घराची दारे-खिडक्या बंद असल्याने कोणालाही इजा झाली नाही. जमावाने पाण्याच्या पिशव्या आणि बाटल्या भिरकावून हल्ला केला. यावेळी जातीय शेरेबाजीदेखील करण्यात आली. मालाड पश्चिम येथे हा प्रकार घडला. या प्रकाराने कांबळे कुटुंबं प्रचंड तणावाखाली आहे. “सध्याची राजकीय परिस्थिती पाहता जातीय द्वेषातूनच हल्ला झालेला आहे, असा आरोप प्रा. कांबळे यांचे चिरंजीव अपरान्त यांनी केला आहे
पोलिसांत तक्रार दिल्यावर मालवणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरेे यांनी याप्रकरणी त्वरित कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे. कांबळे यांच्या घरात त्यांची पत्नी आणि दोन मुले राहतात.
दहशत पसरविणारे असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, गुन्हेगारांवर कारवाई न केल्यास आंदोलन करू, असा इशारा बहुजन अन्याय अत्याचार निर्मुलन कृती समितीचे श्याम झळके यांच्यासह विश्वनाथ बोरकर यांनी दिला आहे.