मुंबई : ‘कमला मिल आगीच्या घटनेदिवशी मला राजकीय नेत्यांकडून दबावाचे फोन आले’, असा गौप्यस्फोट करणाऱ्या मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची नार्को करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. दबाव टाकणाऱ्या नेत्याचे नाव सांगण्यास नकार दिल्याने मनसेने ही मागणी केल्याचे देशपांडे म्हणाले.
मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. यानंतर पालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाईचा धडाका सुरू केला. ही कारवाई करताना, राजकीय नेत्यांकडून दबावाचे फोन आले. मात्र मी कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला. मी घरण्यातला नाही परंतु, त्या नेत्याचे नाव उघड करणार नाही. विरोधी पक्षनेते ते नाव सांगू शोधावे, असा गौप्यस्फोट केला. हा धागा पकडून मनसेने आयुक्तांच्या मार्को टेस्टची मागणी केली आहे. ‘कमला मिल अग्नीतांडवातील काही आरोपी फरार आहेत. पोलीसांनी त्यांना शोधण्यासाठी इनाम लावला आजे. कदाचित आयुक्तांप्रमाणेच पोलिसांवर देखील दबाव आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष घालावे, अशी मागणी केल्याचे देशपांडे यांनी सांगितले.