रत्नागिरी (आरकेजी) : नवं वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील साळवी स्टॉप इथल्या शासकीय जलतरण तलावात तालुकास्तरीय जलतरण स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. चार गटांमध्ये घेण्यात आल्या या स्पर्धेत ६० स्पर्धक सहभागी झाले होते. अतीशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या स्पर्धेत भरघोष बक्षीसांची लयलुट करण्यात आली.
या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांची यादी पुढील प्रमाणे ५ ते १० वर्षे मुलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक चैतन्य कदम (४७.३४ सेकंद) याने आणि द्वितीय क्रमांक ओम केतनकुमार चौधरी (५४.२८ सेकंद) याने पटकावला. तर निरामय योगेश भट (५५.२७ सेकंद) आर्यन विश्वनाथ मोरये (५६.२ सेकंद) यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आहे. ५ ते १० वर्षे मुलींच्या गटामध्ये प्रथम क्रमांक रिया स्वरूप पाडळकर (१ मि. ०४.१७ सेकंद) हिने मिळवला तर द्वितीय क्रमांक आर्या सुनील आग्रे (१ मि. ११.६६ सेकंद) हिने पटकावला. या गटामध्ये अन्विता मंगेश देसाई (१ मि.१५.५ सेकंद) आणि गार्गी योगेश भट (१ मि. २१.१४ सेकंद ) हिला उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरवलं गेलं. १० ते १२ या वयोगटात मुलांमध्ये आर्यन शिरिष प्रभूदेसाई (४५.९८ सेकंद) याने प्रथम तर सोहम देवेंद्र मंजुळे (४६.१० सेकंद) याने द्वितीय क्रमांक मिळवला. या गटात मुलींमध्ये प्रथम क्रमांकावर बाजी मारली श्लोका बेंडके (५२.३८ सेकंद) हिने तर द्वितीय क्रमांक मिळवला निधी प्रशांत गाड (१ मि. ३७.९ सेकंद) या स्पर्धकाने. १२ ते १४ वर्षे वयोगटात मुलांमध्ये यश देवदास (३९.७९ सेकंद) याने प्रथम तर अद्वैत मंगेश देसाई (४७.१ सेकंद) या स्पर्धकाने द्वितीय क्रमांक मिळवला. याच गटात मुलींमध्ये तनया महेश मिलके (४१.३ सेकंद) हिने पहिला तर श्रद्धा सत्यवान बिरवाडकर (५७.१ सेकंद) दुसरा क्रमांक मिळवला. १४ ते १७ या वयोगटात मुलांमध्ये करण महेश मिलके (३१.८२ सेकंद) याने पहिला क्रमांक मिळवला तर अर्चिस ठाकूरदेसाई (३७.१ सेकंद) याने दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली. या सर्व विजयी स्पर्धकांचं जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत व आयोजक मुश्ताक खान यांनी अभिनंदन केलं.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोच नंदकुमार भोसले, लाईफ गार्ड प्रभाकर देवरूखकर, नितीन कांबळे, अजय कांबळे, अक्षय जाधव, सवबान सावकार यांनी मेहनत घेतली. यावेळी देवेंद्र मंजुळे, गणेश बिटोडे, शिरीष प्रभूदेसाई, सुनील आग्रे, केतनकुमार चौधरी, स्वरूप पाडळकर, श्रीपाद देवदास, योगेश भट, मधुलीला देसाई, शरद माणगावकर, सत्यवान बिरवाडकर, भगवान डोईफोडे, हेमंत जाधव, बेंडके आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरीमधून चांगल्या दर्जाचे जलतरणपटू निर्माण व्हावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्यांचं आयोजक मुश्ताक खान यांनी सांगितले. या जलतरण तलावातल्या सभासदांसाठी पुढच्या महिन्यात २८ जानेवारी २०१८ रोजी ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकाराची स्पर्धा घेण्याचं व्यवस्थापनाने जाहीर केलं आहे. सर्व विजय खेळाडूंचं रत्नागिरीकरांकडून कौतुक होत आहे.