मुंबई (निसार अली) : इव्हीएम मशीनद्वारे होणारी मतदान पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेचा वापर करून मतदान घ्यावे, या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाने मंगळवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांच्या अनुपस्थितीत उपजिल्हाधिकार्यांना देण्यात आले .
इव्हीएमद्वारे होणार्या मतदानावर बहुसंख्यांक नागरिकांचा विश्वास नाही. या पद्धतीत पारदर्शकता नसल्याने शंका आणि संभ्रमाचे वातावरण देशभरात निर्माण झाले आहे. तेव्हा पारदर्शकता आणण्यासाठी मतपत्रिका आणि मतपेटी यांद्वारे पुन्हा मतदान सुरू करावे, अशी मागणी समाजाने केली. सकल ओबीसी समाजाच्या महाराष्ट्र अध्यक्षा कांचन नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अफजल अन्सारी, वैशाली महाडिक, शीला पटेल, शैलू एन सी, निसार अली आदी यावेळी उपस्थित होते.