नवी दिल्ली : उस्ताद (अपग्रेडिंग द स्किल्स अँड ट्रेनिंग इन ट्रॅडिशनल आर्टस् / क्राफ्टस् फॉर डेव्हलपमेंट) योजनेमुळे देशभरात २०१५-१६ या वर्षात १३, ६१६ जणांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती अल्पसंख्य व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज राज्यसभेत दिली. अल्पसंख्याकांत पांरपरिक कला तसेच समुदायाशी संबधित हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू झाली आहे.
या योजनेही प्रभावीपणे मलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये १६ ,२०० जणांना विविध प्रकारच्या कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण देण्याचे काम वेगवेगळ्या प्रोजेक्ट इम्प्लीमेंटिंग एजन्सींकडे (पीआयए) नोव्हेंबर २०१६ मध्ये सोपवण्यात आले आहे. ‘उस्ताद’मध्ये ‘हुनर से रोजगार तक’ योजना आहे. यामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या १३, ६१६ जणांना मिळाला.