रत्नागिरी: दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किना-यावर आलिव्ह रिडले जातीची 5 समुद्री कासवे मृतावस्थेत आढळली आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनारा पर्यटकांनी नेहमी गजबजलेला असतो. मुरुडप्रमाणेच दापोलीतील अनेक समुद्र किनारे ऑलिव्ह रेडले या दुर्मिळ कासवांसाठी सुरक्षित मानले जातात. मात्र आता मुरुड समुद्रकिनारीच ऑलिव्ह रिडले जातीची 5 समुद्री कासवे मृतावस्थेत आढळली आहेत. या कासवांचा मृत्यू कशामुळे झाला याचे नेमके कारण कळू शकले नाही. परंतु समुद्रातील होणारे नैसर्गिक बदलाचा या कासवावर परिणाम झाला असावा, असा अंदाल तज्ञाकडून व्यक्त होत आहे. मात्र दुर्मिळ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.