मुंबई, (निसार अली) : जनता दल (सेक्युलर) या पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले यांचे हृद्याच्या तीव्र झटक्याने आज सकाळी निधन झाले. काल (बुधवारी) मुंबईत झालेल्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीला डॉ. ढोले उपस्थित होते. सायंकाळी विदर्भ एक्सप्रेसने निघून आज सकाळी ते अमरावतीला पोहोचले होते. सकाळी मोटारीने शेतावर जात असताना वाटेतच त्याना हृद्याचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. यानंतर त्यांची मोटार झाडावर आदळली. त्यांच्या पश्चात डॉक्टर मुलगा आणि दोन मुली आहेत.
कालच्या बैठकीतच त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यांना निवृत्त वेतन देण्याच्या मागणीसाठी मंत्रालयाला घेराव घालण्याचा तसेच ओबीसींच्या प्रश्नावर आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.