मुंबई, (निसार अली) : मालाड-मालवणी येथील सामाजिक कार्यकर्ते जाहिद बाबर खान यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आरिफा यांचे ते पती होते. लोक आधार समाजिक संस्था, नवनिर्माण समाज विकास केंद्र अशा अनेंक संस्था संघटनांशी त्यांचा संबंध होता. नवीन कलेक्टर कंपाऊंड येथील झोपडपट्ट्यांना भेडसावणार्या विविध प्रश्नांवर जाहिद यांनी आंदोलने केली होती. त्यांच्यामुळे झोपडपट्टीवासियांना सुविधा देणे प्रशासनाला भाग पडले होते. खान यांच्या मागे पत्नी मुले , नातवंडे असा परिवार आहे.