रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी जवळील भाटिमिर्या गावाला पावसाळ्यात धोका निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाला आहे. समुद्राच्या लाटा गावात घुसू नये, यासाठी बांधलेला धुपप्रतिबंधक बंधार्याचा काही भाग लाटांच्या मार्यांनी वाहून गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले आहेत. जवळपास २५ मीटर बंधार्याचा भाग लाटांच्या तडाख्यांनी तुटला आहे.
पावसाळयात भाटीमिर्या येथे समुद्राच्या लाटा वेगाने उसळतात. समुद्राचे पाणी गावात शिरू नये यासाठी मेरिटाईम बोर्डामार्फत ११५० मीटर लांबीच्या धूपप्रतिबंधक बंधार्याची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, हा बंधाराही समुद्राच्या लाटांच्या मार्यांपुढे तग धरू शकलेला नाही. बंधार्याचे मोठमोठे दगड वाहून गेले आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात समुद्राचे पाणी थेट इथल्या ग्रामस्थांच्या घरात घुसण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापुर्वी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.