मुंबई, (निसार अली) : राष्ट्र सेवा दल, मुंबईच्या अध्यक्षपदी शरद कदम यांची निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहिलेले, नंतर छात्र भारतीच्या माध्यमातून विद्यार्थी आंदोलनातून नावारूपाला आलेले शरद कदम मुंबईतील अनेक सामाजिक चळवळीत अग्रेसर आहेत. मुंबईतील वस्त्यांमध्ये चालविलेली डॉ नरेंद्र दाभोलकर विवेक जागर यात्रा, शाळा- महाविद्यालयत सुरु असलेली संविधान जागर यात्रा, दर महिन्याला सुरु असणारा अभ्यास वर्ग आदी कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे.
चंद्रकांत म्हात्रे यांची संघटकपदी निवड झाली आहे. ते शिक्षक आहेत. रात्र शाळेत शिकवितात. शिक्षक भारतीशी आणि शिक्षणाच्या प्रश्नाशी संबंधित आहेत अनेक सामाजिक चळवळीशी त्यांचा संपर्क आहे.
समाजवादी आणि पुरोगामी चळवळ राष्ट्र सेवा दलाला आपली मातृ संघटना मानते. बाल वयात सेवा दलात झालेल्या संस्कारांनी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि समाज सुधारक घडले आहेत. भारतीय नागरिक घडविणारी राष्ट्र सेवा दल ही बिन भिंतीची शाळा आहे.
आंबेडकर जयंतीनिमित्त गिरगाव येथील मुंबई कार्यालयात झालेल्या पहिल्या बैठकीत मुंबईची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली
शरद कदम -अध्यक्ष
चंद्रकांत म्हात्रे-संघटक
उमेश कदम-उपाध्यक्ष
राम कोंडाळकर-उपाध्यक्ष
महादेव पाटील- उपाध्यक्ष
लव कुमार बांडे-उपाध्यक्ष
सतीश उंडाळकर -उपाध्यक्ष
मनोज खराडे -सह संघटक
शाली शेख- सह संघटक
सिरत सातपुते- सदस्य आणि राष्ट्रीय मंडळ प्रतिनिधी
माधुरी पाटील – सदस्य
दुर्गा गुडीलू – सदस्य
प्रफुल दळवी- सदस्य
अजित जोशी – सदस्य
निसार अली – सदस्य
गौतम जाधव कार्यालय प्रमुख म्हणून काम पाहतील.