कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश वाघ यांनी स्वीकारला पुरस्कार
खेड : लोटे औद्योगिक वसाहतीमधील सुप्रिया लाईफसायन्स लि. कंपनीला सर्वोत्कृष्ट कंपनी म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कंपनीला अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंटस् हा सन्मान देऊन गौरविण्यात आले. नुकताच मुंबई येथील कोहिनूर कॉन्टीनेन्टल हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला. सन २०२४ मध्ये फार्मास्युटिकल क्षेत्रात या कंपनीने केलेल्या कार्याची दखल घेऊन कंपनीचा गौरव करण्यात आला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश वाघ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अॅडव्हान्टेज इंडिया केमिकल कॉन्क्लेव्ह अॅवॉर्ड ने त्यांचा गौरव करण्यात आला. या शिवाय देशभरातील अन्य उद्योजकांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यामध्ये बेस्ट कंपनी म्हणून सुप्रिया लाईफसायन्सचा गौरव करण्यात आला. याबाद्दल श्री. वाघ यांचे लोटे असोसिएशन आणि उद्योजकांकडून अभिनंदन होत आहे.