रत्नागिरी : भाजपचे खासदार अजय संचेती यांच्या नावाने बनावट पत्राचा वापर करून अनेकांची फसवणूक करणार्या आरोपीला पळून जाण्यात मदत करणार्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात रत्नागिरी शहर पोलीस अडचणीत आले आहेत.
या प्रकरणी संतोष नारायणकर याला अटक करण्यात आली होती. त्याला पकडण्यासाठी राजस्थान इथे पोलिसांचे पथक गेले होते. पोलीस तपासात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकातील दोन कर्मचाऱ्यांनी त्याला पळून जाण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाले. हवालदार श्रीनिवास नाटेकर आणि शिपाई शंकर शिंदे अशी त्यांची नावे आहेत. त्यांना निलंबित करण्यात आले आहे. या दोघांनी नारायणकर याच्याकडे पैशांची मागणी केली होती. आरोपीच्या फोन रेकाँर्डवर त्यांचे नंबर आढळले आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.