मुंबई, (निसार अली) : कौटुंबिक जबाबदार्या सांभाळत वयाच्या ४५ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण होण्याचा मान मालवणीतील कांजीभाई मेघाजी सोळंकी यांनी मिळवला आहे. अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करायचेच असा ध्यास कांजीभाईंनी घेतला होता. अखेर त्यांनी दहावीची परिक्षा उत्तीर्ण केली. त्यांना ५५ टक्के गुण मिळाले आहेत.
कांजीभाई हे मालवणी क्रमांक ५ येथील जुने कलेक्टर कंपाऊंड येथील रहिवाशी आहेत. मुंबई महापालिकेच्या कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ते शस्त्र क्रियागार परिचर या पदावर कार्यरत आहेत. कौटुंबिक जवाबदार्यांमुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नव्हते. शिक्षणाची आवड मात्र त्यांना अस्वस्थ करत होती. सरदार वल्लभ भाई पटेल रात्र शाळेतून त्यांनी गुजराती माध्यमातून परीक्षा दिली आणि ते उत्तीर्ण झाल. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मुली बारावी उत्तीर्ण झाल्या आहेत आणि मुलगा वाणिज्य विभागातून पदवी घेत आहे.