मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जंयतीचे औचित्य साधून मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती समितीच्यावतीने प्रथमच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. रविवारी २९ एप्रिल रोजी ११ वाजता पोलीस क्लब प्रेरणा हॉल, किल्ला कोर्ट येथे जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त नायमूर्ती एच एल गोखले, ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश विलास बांबर्डे, मुंबईचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी योगेश मनाटकार, आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच मुंबईतील न्यायालयातील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार अशी माहिती समितीचे कार्यकर्ते रवी पवार, संजय शेलार, शरद साळवे, चंद्रकांत बनकर यांनी दिली.