![](http://www.konkanvruttaseva.com/wp-content/uploads/2017/09/12.jpg)
रत्नागिरी, (आरकेजी) : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील वाटूळ घाटात हा अपघात रात्री(शुक्रवार) पावणे दहाच्या सुमारास झाला.
गोव्यावरून मुंबईला जाणारी गोव्याची लक्झरी बस रात्री वळणाचा अंदाज न आल्याने वाटूळ घाटामध्ये उलटली. वाटूळ येथील आदर्श विद्या मंदिराजवळच्या अवघड वळणावर हा अपघात घडला. अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून बसमधील 32 प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण 40 प्रवासी प्रवास करत होते. जखमी प्रवाशांना ओणी रुग्णालयात आणि लांजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातही काही जखमींवर उपचार सुरु आहेत. बसमधील सर्व प्रवासी हे सिंधुदुर्गचे आहेत