नवी दिल्ली : भाजपाने राष्ट्रपतीपदाचे उमेवार म्हणून रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर केल्यानंतर आज काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांचे नाव जाहीर केली आहे. मीरा कुमार याही दलित असून काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्या आहेत.
१९७३ मध्ये त्यांची भारतीय विदेश सेवेत निवड झाली. परंतु, त्यांनी नोकरीचा राजीनामा देत राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. लोकसभेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या त्या कन्या आहेत. मीरा कुमार यांनी केंद्रात सामाजिक न्याय मंत्रिपदही भूषवले आहे. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. राजकारण आणि समाजकारण यांचा त्यांना प्रदिर्घ अनुभव आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपासमोर आव्हान निर्माण झाले आहे.