मुंबई, (विशेष प्रतिंनिधी) : विहिरीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यु झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. गोरेगाव येथील आरे कॉलनीतील यूनिट क्रमांक १६ मधील वणीच्या पाड्यात असलेल्या विहिरीत ती पोहण्यासाठी उतरली होती. प्रथमेश संजय मालवणकर वय(१७), शुभम शर्मा वय(१८) अशी मृतांची नावे आहेत. प्रथमेश हा अंधेरी पूर्वेतील मालपा डोंगरी येथे राहत होता, तर शुभम हा विलेपार्ले पूर्वेतील संजय गांधी नगर येथे कुटुंबासह वास्तव्यास होता.
अंधेरी पंचिम येथील एका खाजगी क्लासमध्ये शिकवणी संपल्यावर पाच जण याठिकाणी ती आली होती. त्यांची क्लासची वेळ ही ७ ते १०.३० पर्यंत असते. क्लास सुटल्यावर पाचही जण बेस्ट बसने आरे कॉलनीतील वणीच्या पाड्यात फिरायला आली. इथे आल्यावर जवळच असलेल्या विहिरीत तीन मुल पोहण्यासाठी उतरली. अचानक प्रथमेश मालवणकर हा विहिरीच्या कडेला असताना पाण्यात बुडाला. त्याला वाचवण्याचे प्रयत्न शुभम शर्मा याने केले असता तोसुद्धा त्या पाण्यात बुडाला. तिसऱ्या मुलाला थोड़ पोहता येत असल्यामुळे तो बाहेर आला. बाहेर आल्यावर त्या मुलांनी त्यांना वाचण्यासाठी आरडाओरड़ सुरु केली. मात्र त्याआधीच ते दोघे विहिरीत असलेल्या दलदलीत रुतले. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आरे पोलिसांना दिली. अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. मात्र जवानांना विहिरीत चाळीस फुट खाली असलेला मृतदेह काढ़णे शक्य नव्हतं. अखेर पोलिसांनी याची माहिती नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फ़ोर्स ( एनडीआरएफ ) या टीमला दिली. आपातकालीन विभागाच्या जवानांनी या विहीरीची माहिती स्थानिक नागरिकाकडून घेतले आणि शोध कार्य सुरु केले. दीड तासांनंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात पाठवण्यात आले.