मुंबई : कॉव्हेस्ट्रो इंडियाने पाठिंबा दिलेल्या व 3 महिलांसह 35 सदस्यांचा समावेश असलेल्या APSIT च्या युवकांच्या टीमने विजेतेपद पटकावले आहे. APSIT मॉडिफाइड ऑटो क्लबच्या टीमने एकत्रितपणे सौरऊर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक वाहन तयार केले आणि एएमटी मोटोकॉर्पने संगमनेर येथी अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे आयोजित केलेल्या इंडो एशियन सोलार चॅलेंज (आयएएससी) – 2019 मध्ये या वाहनाने सहभाग घेतला. या उपक्रमामुळे उत्कृष्ट दर्जाची नावीन्यपूर्ण उत्पादने व सेवा देण्याची कॉव्हेस्ट्रोची क्षमता आणखी वधारली. या उपक्रमातून, नावीन्यपूर्ण व शाश्वत उत्पादने निर्माण करण्याप्रतीची आमची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. ठाणे येथील ए. पी. शहा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी – APSIT च्या मॉडिफाइड ऑटो क्लब (एमएसी) टीमने इंडो एशियन सोलार चॅलेंजचे विजेतेपद मिळवले आहे आणि एंड्युरन्स विजेतेपद, चॅम्पिअनशिपमध्ये सर्वोत्तम डिझाइन, सर्वोत्तम नावीन्य हा गौरवही प्राप्त केला आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना, कॉव्हेस्ट्रो (इंडिया) चे व्यवस्थापकीय संचालक अजय दुर्रानी यांनी सांगितले, “कॉव्हेस्ट्रोमध्ये आम्ही समाजातील नावीन्यपूर्ण प्रयत्नांना पाठिंबा देण्याबरोबरच, आमच्या उत्पादनांची क्षमता, टिकाऊपणा वाढवणे याला महत्त्व देतो. या विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांना पाठिंबा देणे आणि भारत हे नावीन्याचे केंद्र असल्याचे दर्शवणाऱ्या व संपूर्ण जगात आदर्श घालून देणाऱ्या भारतीय युवकांना उत्तेजन देणे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. APSIT मधील विद्यार्थ्यांनी केलेल्या नावीन्याबद्दल त्यांचे अभिनंदन. यूएन एसडीजीच्या सर्वंकष व जागतिक दृष्टिकोनाचे कॉव्हेस्ट्रोसमर्थन करते आणि त्याचा भर शाश्वत लाइटवेट मोबिलिटीवरही आहे. ऑटोमोटिव्ह उद्योगाचे हेच भविष्य असणार आहे आणि कॉव्हेस्ट्रोमध्ये आम्ही वजनाने हलक्या, दणकट ई-वाहनांच्या निर्मितीमध्ये जास्तीत जास्त योगदान देत आहोत”.
टीमने इलेक्ट्रिक सोलार व्हेइकल चॅम्पिअनशिप 2019 मध्ये सहभाग घेतला आणि 3 गौरव मिळवले – अॅडव्हेंचर क्लास एकंदर कामगिरीच्या बाबतीत उत्तेजनार्थ; विजेतेपद – एंड्युरन्स टेस्ट; विजेतेपद – क्रॉस पॅड.
APSIT चे प्राचार्य डॉ. उत्तम कोळेकर यांनी नमूद केले, “युवकांना सहभागी व सबल करण्याच्या हेतूने उद्योग – शिक्षणतज्ज्ञ यांच्या सहयोगाचे हे आदर्श उदाहरण आहे. उद्योगामध्ये भागीदारी करण्यासाठी कॉव्हेस्ट्रो हा उत्तम भागीदार राहिला आहे. आमच्या टीमचा आम्हाला अतिशय अभिमान आहे.”
टीम लीड विशाल यांनी सांगितले: “आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल व मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही कॉव्हेस्ट्रोचे आभारी आहोत. आमचे शिक्षक व मार्गदर्शक यांनी केलेले तपशीलवार मार्गदर्शन, तसेच या स्पर्धेसाठी साजेशी असणारी उत्पादने यामुळे आम्हाला विजय मिळवणे शक्य झाले.”
394W निर्माण करणाऱ्या, तसेच 9.52 सेकंदांत प्रति तास 0 ते 45 किमी पिक-अपसह प्रति तास 45 किमी जाण्यासाठी 6.75A प्रमाणे 63V ची निर्मिती करण्याची क्षमता असणाऱ्या 113 सोलार सेल्सची ताकद सोलार वाहनाला देण्यात आली आहे. वाहनाचे वजन 160 किलो आहे आणि लांबी 2.53M आहे. ही कार प्रति तास 10 किमी बॅटरी डिसकनेक्ट करत, थेट सोलार पॅनलवर चालू शकते. कारमध्ये कॉव्हेस्ट्रोने तयार केलेल्या व उत्तम उष्णतारोधक गुणधर्म असणाऱ्या पीआयआरचा (पॉलिआयसोसिअॅन्युरेट – हाय परफॉर्मन्स फोम) समावेश आहे. हे इन्सुलेटिंग साहित्य चालकाला जास्तीत जास्त सुरक्षितता देते,बॅटरी व अन्य घटकांनी निर्माण केलेल्या उष्णतेपासून संरक्षण करते. कोणतीही दुर्घटना घडल्यास, हे साहित्य आग पसरणे रोखते. कारची बाहेरील रचनाकॉव्हेस्ट्रोच्या पॉलिकार्बोनेट कच्च्या मालापासून बनवलेली असते. ती स्थिरता व क्षमता दर्शवते आणि कार अॅल्युनिमिअमपासून बनलेली असल्यास कारच्या निम्म्या वजनापेक्षा कमी वजनाची असते. परिणाम म्हणून सौरऊर्जा असणारी कार निर्माण झाली. या कारमध्ये उच्च कामगिरी, उच्च मायलेज व उच्च पिक-अप असे फायदे समाविष्ट आहेत.