मुंबई : भारतीय तरुणांना स्मार्टफोनकडून केवळ मूलभूत गरजांपेक्षा काही तरी जास्त मिळण्याची अपेक्षा असते.आजची तरुण पिढी ही पैशाच्या मूल्यासोबतच आकर्षक डिझाइन आणि नाविन्यपूर्णता देखील शोधत असते. या मागण्या समजून घेऊन यूलॉन्ग द्वारा स्थापित कूलपॅड या आघाडीच्या जागतिक स्मार्टफोन ब्रॅंडने कूलपॅड कूल ३ प्लस लॉन्च केला आहे. हा फोन ड्यूड्रॉप डिस्प्ले, हेलिओ ए२२, ड्युअल सिक्योरिटीने सज्ज आहे.
एमटी ६७६१ (हेलिओ ए२२), क्वाड कोर २.० गिगाहर्टज क्लॉक स्पीड आणि ३ जीबी रॅम व आकर्षक ५.७” ड्यूड्रॉप स्क्रीन असलेला हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च झाला असून त्यांच्या किंमत भलतीच किफायती आहे. आजच्या तरुण पिढीला नजरेसमोर ठेवून डिझाइन केलेला कूलपॅड कूल ३ प्लस ओशन ब्लू आणि चेरी ब्लॅक या दोन नवीन आणि बोल्ड रंगांमध्ये उपलब्ध असेल. कूल ३ प्लस मध्ये स्टोरेजच्या दृष्टीने २ जीबी रॅम / १६ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी रॅम / ३२ जीबी स्टोरेज असे दोन प्रकार उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत अनुक्रमे ५,९९९/- रु आणि ६,४९९९/- रु आहे. या स्मार्टफोनचे बुकिंग २ जुलैपासून अमेझॉनडॉटइनवर करता येईल.
कूलपॅड कूल ३ प्लस एक मल्टीटास्कर आहे, जो या किंमतीच्या इतर फोन्सपेक्षा अधिक चांगला परफॉर्मन्स देतो. कूलपॅड कूल ३ प्लस इतर सर्व स्मार्टफोनपेक्षा वरचढ असण्याचे कारण आहे, की त्यात ५.७” ड्यूड्रॉप स्क्रीन सारखे प्रीमियम फीचर्स खूपच स्पर्धात्मक दरात उपलब्ध आहेत. ८.२ एमएम जाडी असलेला हा फोन वजनात खूपच हलका आणि सुटसुटीत आहे. यातील प्रगत फिंगरप्रिंग सेन्सर १२% जलद अनलॉकिंगची सुविधा देतो, जे घाई गडबडीत असणा-या लोकांसाठी फायद्याचे आहे. आणि शेवटचे म्हणजे, या फोनमध्ये युजीबी ओटीजी (ऑन द गो) आहे, ज्यामुळे टेक-प्रेमी यूझर्स आपले डिव्हाईस कीबोर्ड, कार्ड रीडर, यु-डिस्क वगैरेंशी जोडू शकतात. तसेच ब्रॅंडने ५.० ब्लूटुथ, वाय-फाय, जीपीएस, ग्रॅव्हिटी सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर, इ. सारखी साहाय्यक फीचर्स आपल्या फोनमध्ये अंतर्भूत केली आहेत.
कूलपॅड इंडियाचे सीईओ फिशर यूआन म्हणाले, “कूलपॅड कूल ३ प्लस लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हा फोन या देशात बजेट स्मार्टफोनची व्याख्याच बदलून टाकेल. आम्हाला खात्री आहे की हा स्मार्टफोन भारतीय लोकांना आवडेल आणि कूलपॅडला स्वतःचे सर्वात लाडका स्मार्टफोन ब्रॅंड बनण्याचे स्वप्न साकार करण्यास मदत होईल व या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ३ दशलक्ष स्मार्टफोनचा टप्पा गाठू शकेल.”