चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून प्रशांत यादव मित्र मंडळातर्फे गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चिपळूण व देवरुख – संगमेश्वर येथील रुग्णांसाठी अस्थिरुग्ण उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
दिनांक २२ व २३ एप्रिल रोजी हॉटेल ड्राईव्ह इन लॉन, पो.धामणी, एच. पि. पेट्रोल पंप जवळ, ता. संगमेश्वर, वेळ सकाळी ९.३० वाजता ते दुपारी १ वाजेपर्यंत तर दुपारी २ ते ५.३० वाजेपर्यंत व दिनांक २४ व २५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत, दुपारी २ ते ५.३० वाजेपर्यंत चिपळूण येथे बहादूरशेख नाका, सहकार भवन येथे हे शिबिर होईल, अशी माहिती वाशिष्ठी डेअरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस संस्थापक अध्यक्ष, उद्योजक प्रशांत यादव व चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व वाशिष्ठी डेअरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
प्रशांत यादव मित्र मंडळातर्फे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अस्थि रुग्ण तपासणी शिबिर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा ८०० रुग्णांनी लाभ घेतला होता. त्यावेळी ‘रुग्ण येताना कण्हत आले, अन जाताना हसत गेले,’ असे चित्र पहावयास मिळाले होते. या शिबिराचे सर्वत्र कौतुक झाले. विशेष म्हणजे कोकण विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात अस्थि रुग्ण उपचार शिबिराचे नियोजन झाले होते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील या शिबिराचे आयोजन करण्यात आले
ह्या शिबिरासाठी जोधपूर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. नंदकिशोर पाराशर, डॉ. हेमंत कुमार पाराशर, डॉ. गौरव पाराशर, डॉ. राकेश पाराशर रुग्णांची तपासणी करून उपचारदेखील करणार आहेत. तरी अस्थिरुग्णांनी आपली नाव नोंदणी मोबाईल नंबर ९८९०३९३८२३/९४२२४०५०४८/ ९८९००२८०७८/८५३०४९८७२४ दिनांक २० एप्रिल पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.