कोल्हापूर : मुंबईतील सफल विकास वेलफेअर सोसायटी या सामाजिक संस्थेला ऑल जर्नलिस्ट्स अँड फ्रेंड्स सर्कल या पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय विशेष प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापुरात हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय विषयाचे वरिष्ठ विश्लेषक व पत्रकार जतीन देसाई व वरिष्ठ पत्रकार सचिन परब, माहिती उपसंचालक डॉ.संभाजी खराट यांच्या हस्ते व इतर मान्यवर व पत्रकार यांच्या उपस्थितीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निसार अली सय्यद यांनी पुरस्कार स्वीकारला.
सफल विकास वेलफेअर सोसायटीच्या वतीने कोविड काळात दोन रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते. तसेच सॅनिटायझेशन,धान्य वाटप, शिजवलेले अन्नाचे वाटप. मास्क,हॅण्ड सॅनिटायझर वाटप, अपनी सुरक्षा अपने हाथ महामारी पर करेंगे मात ही मोहीम राबवत कोरोना संशयित रुग्ण शोध मोहीम राबवली होती.संस्थेच्या कार्याची दखल घेत ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र प्रत्येक पुरस्कार हा विशेष असतो. तसेच महत्व ही वेगळे असते. मात्र यातून अधिक समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा प्राप्त होते. AJFC संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल, राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कोळी, सचिव बाळकृष्ण कासार यांचे आभार असे सचिव वैशाली महाडिक म्हणाल्या.