मुंबई, (निसार अली) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ब्रिगेड युथ विंगच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी मुंबईचे जुबेर कुरेशी यांची नेमणूक करण्यात आली. ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मनजीत सिंग कलसी व राष्ट्रीय सरचिटणीस राकेश भसीन यांच्या निर्देशानुसार, युवक राष्ट्रीय अध्यक्ष सुनील भसीन यांनी कुरेशी यांची नियुक्ती केली आहे.
संघटना वाढीसाठी अधिक जोमाने काम करेन अशी प्रतिक्रिया कुरेशी यांनी नियुक्तीनंतर दिली.