मुंबई : झूमकारची आजची शेअर्ड सबस्क्रिप्शन बाजारपेठ दरवर्षी बदल होणा-या एकूण शहरी प्रवासी कार यूनिटपैकी जवळ जवळ १२% आहे. आजच्या ग्राहकांचा व्यापक कल आणि ‘कारच्या पूर्ण मालकी ऐवजी सहज उपलब्धता’ या मानसिकतेच्या जोरावर फक्त ऑगस्ट २०१९ मध्ये झूमकार शेअर्ड मोबिलिटी मंचाद्वारे १५००० लोकांनी कार सदस्यता घेतली. ऑगस्ट २०१९ मधील विक्री लक्षात घेता या कामगिरीमुळे व्हॉल्युमच्या बाबतीत मारुती सुझुकी आणि हयुंडाई मोटर्स इंडियाच्या खालोखाल झूमकार भारतातील तिस-या क्रमांकाची ऑटोमोबाइल कंपनी बनली आहे.
उल्लेखनीय म्हणजे झूमकारने यावर्षी मार्चमध्ये ३२०० कार सदस्यता घेऊन देशातील सर्वात मोठ्या कार डीलरशिपपेक्षा दुप्पट विक्री करून विक्रम केला. तेव्हापासून त्यांचा शेअर्ड सब्स्क्रिप्शन मंच तब्बल ५ पटींनी वाढला आहे व दरमहा १५००० युनिट्सचा रन-रेट त्याने साध्य केला आहे. या मंचाने अलीकडेच निस्सान, टोयोटा, फोक्सवॅगन आणि रेनॉल्ट यासह अनेक वाहन कंपन्यांशी करार केला आहे आणि त्यांची मॉडेल्स समाविष्ट केली आहेत.
झूमकारचे सहसंस्थापक आणि सीईओ ग्रेग मोरान म्हणाले, “तरुण ग्राहकांना त्रास-मुक्त कार मालकीचा परिचय करून देणे हे आमचे व्हिजन आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना अधिक चांगले मोबिलिटी पर्याय देऊन नेहमी सक्षम बनवतो आणि पुढेही असेच करत राहू. ऑटोमोबाइल उद्योगावरदेखील याचा सकारात्मक परीणाम होतो कारण यामुळे विविध सामाजिक आर्थिक गटांच्या कारच्या स्वामित्वाशी निगडीत आर्थिक अडचणी दूर होतात. त्याबरोबरच आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर चुकलेला डिजिटल ओघ या क्षेत्रापर्यंत पोहोचतो.”