मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४: कार शेअरिंगसाठी अग्रगण्य बाजारपेठ असलेल्या झूमकारने आज थ्रिफ्ट स्टोअर ही एक नवी उत्पादन श्रेणी लाँच केली. नुकतेच नॅसडॅकच्या यादीत स्थान मिळवलेल्या झूमकार कंपनीची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. त्याच दिवशीच्या बुकिंगसाठी ५० टक्क्यांपर्यंत सवलत आणि त्यापुढील दिवशी ३० ते ४५ टक्क्यांपर्यंत सवलत असेल. अतिथिंसाठी सहज उपलब्ध असलेली आणि किफायतशीर अशी ही योजना आहे. भारतातील ४५ पेक्षा जास्त शहरांमध्ये विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवर अतिथींसाठी डिलिव्हरी देण्यासह ही सेवा उपलब्ध आहे. यात हॅचबॅक, सेडान, एमयूव्ही, एसयूव्ही, ईव्ही आणि लक्झरी कार यासारख्या सर्वसमावेशक पोर्टफोलिओतील कार उपलब्ध असतील.
झूमकारचे सीईओ आणि सह संस्थापक ग्रेग मॉरन म्हणाले, ”आम्हाला थ्रिफ्ट स्टोअरला अधिक मजबुतीने पुढे न्यायचे आहे. या सेवेद्वारे ग्राहकांना सेल्फ ड्राइव्ह प्रवासाचा स्वतंत्र अनुभव येईल. आमच्या स्थानिक यजमानांसाठीदेखील ही योजना गेम चेंजर ठरणार आहे. स्थानिक यजमानांनी त्यांची कार बुकिंग होताच तत्काळ उपलब्ध करून द्यायची आहे. जेणेकरून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच शाश्वत आणि प्रभावी कार शेअरिंग संरचनेत योगदान देता येईल. हे विशिष्ट काळातील मार्केटिंग कँपेन नाही. सेल्फ ड्राइव्हिंगच्या अनुभवासाठी झूमकार हे अत्यंत सुविधाजनक आहे. तसेच दैनंदिन ग्राहकांसाठी अत्यंत किफायतशीर आहे.”
मागणी जास्त वाढल्याने सध्याच्या काळात किरायाने मिळणाऱ्या टॅक्सींचे भाडे अमर्याद वाढले आहे. सेल्फ ड्राइव्ह कारचे स्वरुप बदलून घेत आमच्या कंपनीने ग्राहक प्रथम हा दृष्टीकोन ठेवत अत्यंत किफायतशीर दरात आनंद देणारी सेवा उपलब्ध केली आहे. झूमकार प्लॅटफॉर्मवरील स्थानिक यजमानांना याद्वारे आठवड्यातील कामाच्या दिवसांमध्ये स्वत:च्या कारचा वापर वाढवता येईल. तसेच त्यांच्या एकूण कमाईतही वृद्धी होईल.
सेल्फ-ड्राइव्हचे महत्त्व आणि किफायतशीरपणा वाढवण्यासाठी ‘थ्रिफ्ट स्टोअर’ मध्ये पारदर्शीपणा आणि परवडणारी दर रचना ठेवण्यात आली आहे. आमच्या मौल्यवान ग्राहकांशी असलेले नाते दीर्घकाळ टिकवणे व विश्वास निर्माण करणे, हाच यामागील उद्देश आहे.
झूमकारचे अध्यक्ष आदर्श मेनन म्हणाले, ”थ्रिफ्ट स्टोअर ही आमची सर्वात सुविधाजनक आणि किफायतशीर प्रवासाची ऑफर आहे. विशेषत: सेल्फ ड्राइव्हकरिता यात स्वातंत्र्य देण्यात आले आहे. अनावश्यक खर्चाचा ताण न घेता, अति खर्च न करता आत्मविश्वासाने कार चालवण्याचा आनंद ग्राहकांनी घ्यावा, असा आमचा उद्देश आहे. तर दुसरीकडे बुकिंग जास्तीत जास्त वाढवत यजमानांचे उत्पन्न वाढवण्याचाही आमचा प्रयत्न राहिल.”
ताज्या अहवालानुसार, झूमकारने ४.७ च्या सरासरी रेटिंगसह एनपीएसमध्ये वृद्धी दर्शवली आहे. ग्राहक केंद्रित नूतनाविष्कार आणि सेल्फ ड्राइव्ह कार शेअरिंग संरचनेबाबत विस्तारीत दृष्टीकोनाप्रति वचनबद्धता ठेवत ‘झूमकार’ने थ्रिप्ट स्टोअर हे उत्पादन बाजारात आणले आहे.