रत्नागिरी (आरकेजी): अनंतचतुर्थीच्या दिवशी गुहागरमधील झोबंडी पायरवाडी येथे दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत जखमी झालेल्या दोन संख्या भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भावांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी गुहागर पोलिसांनी १५ जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनप्रसंगी फटाके वाजवण्यावरून झोबंडी येथे दोन गाटनमध्ये हाणामारी झाली होती. यामध्ये एकूण ८ जण जखमी झाले होते. त्यातील दोन जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुरेंद्र सकपाळ व महेंद्र सकपाळ या दोन भावांचा कराड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला झाला आहे. विशेष म्हणजे या मारहाणीनंतर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी गुहागर पोलीसांनी एकूण २३ जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर आतपर्यंत १५ जणांना पोलीसांनी अटक देखील केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवरुन झालेला वाद हा या मारहाणीला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या मारहाणीमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.