डोंबिवली : औद्योगिक विभागातील फेज एक येथील येथील झेनिथ कंपनीला रात्री उशीरा अचानक भीषण आग लागली. प्रथम दर्शनी शॉटसर्किटमुळे आग लागण्याचे सांगण्यात येत आहे. रबराचे उत्पादन करणारी कंपनी असून रबरमुळे भीषण आग लागली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.
आग आटोक्यात आली असली तरी आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. सुदैवाची बाब म्हणजे आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अद्याप आग पूर्णपणे विझलेली नसून सध्या कुलिंगचं काम सरू आहे. स्लबखाली रबर सिट असल्याने जोपर्यंत त्या बाजूला काढल्या जात नाहीत तोपर्यंत आग धुमसतच राहणार आहे. त्यामुळे आग कधी विझेल हे निश्चित सांगत येत नाही. सोमवार रात्रीपासून मंगळवार सकाळपर्यंत 7 बंब आग विझविण्याचे जिकरीचे काम करीत होते. अजूनही दोन बंब घटनास्थळी आहेत. नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून आग कशामुळे झाली यांची सविस्तर माहिती नंतरच समजेल अशी माहिती अग्नीशमन अधिकाऱ्यांनी दिली.
डोंबिवली औद्योगीक विभागात या वर्षी एकूण 5 कंपन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आगी लागल्याच्या घटना झाल्या आहेत. यामध्ये दोन टेक्सटाईल, एक किचन क्राफ्ट स्टील इंजिनिअरिंग, एका इलेक्ट्रिकल आणि रबर कंपनी अशा आगीच्या घटना झालेल्या कंपन्या आहेत.
औद्योगीक विभागातील फेज एक मध्ये झेनिथ रबर कंपनीत रबर उत्पादनाचे काम होत असून एकूण 600 कर्मचारी तीन पाळ्यात काम करीत आहेत. कंपनी मालकाचे नांव व्होरा असल्याची माहिती समोर येत आहे.