संगीताला परिभाषा देणाऱ्या आणि अनेक होतकरू संगीतकार व गायक यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या संगीत सम्राट या कार्यक्रमाच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला इतकं प्रेम दिलं की दुसऱ्या पर्वानंतर आता संगीत सम्राट महासंग्राम हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. कार्यक्रमाची रूपरेषा ही सारखीच असून या कार्यक्रमात पर्व १ आणि पर्व २ मधील टॉप ६ स्पर्धकांमध्ये सुरांची मैफिल प्रत्येक आठवड्याला रंगते.
संगीत सम्राट महासंग्रामच्या मंचावर आदर्श आणि राहुल सोबत आनंद शिंदे हे देखील परीक्षकाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत. तसेच पर्व २ मधील कॅप्टन्स या महासंग्रामचा हिस्सा नसणार आहेत. प्रियांका बर्वे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. ही स्पर्धा दिवसेंदिवस अटीतटीची होत आहे.
संगीत सम्राट महासंग्रामचा विजेता कोण ठरणार हे पाहण्यासाठी बघत राहा संगीत सम्राट महासंग्राम बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवावर