रत्नागिरी : कोणत्याही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी उत्पादक लोकसंख्येची गरज असते. देशात युवकांची संख्या सतत वाढत आहे. देशातील युवकानी देशनिर्मितीचे कार्य करावे, असे मत महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढावा यानी व्यक्त केले.
डॉ. बाबा आढाव हे रत्नागिरी दौर्यावर आले होते. यावेळी एसपी हेगशेट्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्याची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी संवाद साधताना त्यांनी भारत देश देशातील कामगार, घरेलू कामगार कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, रिक्षाचालक, असंघटीत क्षेत्रातील कामगार यांच्या कष्टावरती उभा आहे, असे सांगितले. त्यासाठी अशा लोकाना सहकार्य करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. देशाच्या प्रगतीकडे लक्ष न देता जात, धर्म, पंत यामध्ये आपण अडकलो आहे. विद्यार्थ्यांचे कौतुक करताना एस. एम. जोशी यांच्या विचारावर आधारलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेणे भाग्य आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यानी डॉ. बाबा आढाव याना सदिच्छा भेटीबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधले त्याबद्दल धन्यवाद दिले. संवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सचिन टेकाळे यानी मानले.