मुंबई, (निसार अली) : मध्यप्रदेशात शेतकर्यांवर गोळीबार करणार्या भाजपा सरकाविरोधात मुंबई युवक काँग्रेसने आज आझाद मैदान येथे मूक निदर्शने केली. गोळीबारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी आणि मीनाक्षी नटराजन यांना सरकारने अटक केली होती. त्याचाही तीव्र निषेध करण्यात आला. युवक काँग्रेसचे सुदर्शन भट्ट यांच्या नेतृत्वाखाली भाजपाविरोधात तोंडाला काळ्या पट्टया बांधून निदर्शने केली गेली.