रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस.पी. हेगशेट्ये महाविद्यालयात महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकार्यांसाठी युवा माहिती दुत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माहिती अधिकारी मिलिंद बांदीवडेकर या कार्यशाळेला उद्बबोधित केले.
दरम्यान या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्बबोधित करताना बांदीवडेकर यानी शासनाच्या विवीध योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची पद्धती, शासकीय योजनांच्या संदर्भातील वेबसाइट याची सखोल माहिती देण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवा माहिती दुतानी या सर्व योजनांची महिती प्रत्येक गावातील किमान पन्नास घरापर्यंत पोहोचवावे. त्याचबरोबर महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकार्याना युवा माहिती दुत नेमनुक करण्याची सुचना करण्यात आली.
दरम्यान या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य सुकुमार शिंदे यानी या कार्यशाळेला शुभेच्छा व्यक्त करताना राष्ट्रीय सेवा योजनेची व युवा माहिती दुताची भुमिका स्पष्ट केली. कार्यशाळेचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक लांजा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राहुल मराठे यानी केले.
या कार्यशाळेला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकार्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सुशील साळवी यानी मानले.