१० वी, १२ वी, पदवी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव समारंभ व करिअर मार्गदर्शन संपन्न, बॅग, नोटबुक, पेन व गौरवपत्र प्रदान..!
माणगाव : रविवार १७ जुलै रोजी युवा क्रांती संघ करिअर डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने तळा-माणगाव-रोहा तालुक्यांतील दहावी, बारावी व पदवी परिक्षा २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या १०० विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार अनेक प्रमुख मान्यवर व युवा क्रांती संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या हस्ते करिअर डेव्हलपमेंट सेंटर मु. उमरोली, ता. माणगांव, जि. रायगड येथे करण्यात आला. सत्कारानिमीत्त विद्यार्थ्याना बॅग, नोटबुक, पेन व गौरवपत्र प्रदान आले. पॅावरपॅाईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
मा. व्ही. टी. वानखेडे – Ex चिफ मॅनेजर(सिवील)/Ex चेअरमन AISTSCEWA ONGC मुंबई, मा. ए. एल. निकाळजे – मॅनेजर (ट्रान्सपोर्ट)/माजी कार्याध्यक्ष CWC ONGC मुंबई, मा. डी. डी. कटारे – Ex. सुप्रिडेंट इंजिनीअर (प्रोडक्शन) CWC AISTSCEWA ONGC मुंबई, मा. व्ही. यु. गायकवाड – चिफ इंजिनीअर (प्रोडक्शन)/ EX CWC मेंबर AISTSCEWA ONGC मुंबई,
वानखेडे मॅडम, गायकवाड मॅडम, कटारे मॅडम, TCS मॅनेजर आयु. सुधीर सापळे साहेब, कोकण रेल्वे वरिष्ठ विभाग अधिकारी आयु. सुभाष विठ्ठल कासे साहेब, कासे मॅडम, श्रामणेर-बौद्धाचार्य आयु. नंद साळवी बाबा, उज्वला साळवी आई, कॉर्पोरेट शेफ मुंबई आयु. सुभाषजी शिर्के, Siemens मध्ये कार्यरत असणारे आयु. मोहन गवाणे साहेब, आयु. भिम फाऊंडेशन चे कार्यकर्ते आयु. भिमराव गायकवाड व आयु. संदेश माळी इ. प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
तसेच युवा क्रांती संघ ~ करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे संकल्पना-संस्थापक आयु. सुनिल कदम, युवा क्रांती संघाचे अध्यक्ष आयु. संदेश सोनावणे, सचिव -सुनिल गायकवाड, सेंटर कोर्डिनेटर आयु. प्रशांत शिंदे सर, कार्याध्यक्ष अनिलजी मोरे, उपाध्यक्ष आयु. बाळकृष्ण लोखंडे, कोअर कमिटी सदस्य आयु. नितीन शिर्के, आयु. सचिनजी शिंदे, आयु. राहुलजी मोरे, सदस्या रेश्मा लोखंडे मॅडम तसेच प्रमुख संघटक नितीनजी साळवी, नितेश कानाडे, सुजल शिर्के इ. उपस्थित होते सर्वानी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बहुमूल्य योगदान दिले. तसेच तळा-माणगांव-रोहा तालुक्यांतील १०० विद्यार्थी व पालकांची बहुमूल्य उपस्थिती होती. अतिशय उत्साहवर्धक वातावरणात विद्यार्थी गुणगौरव समारंभ पार संपन्न झाला.