Malad : पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मुंबई युवा जनता दलाच्या पुढाकाराने ५ जून रोजी मुंबईत पाच ठिकाणी तुळशीच्या रोपांचे तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. युवा जनता दलाचे मुंबई अध्यक्ष केतन कदम यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
उत्तर मुंबईत कांदिवली पश्चिम चारकोप, अपना बाजार येथे किरण बागुल, सुधीर यादव, सशांक सागरे, सागर कर्दम यांनी 100 तुळशीच्या रोपांचे व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात केले.
तर चिक्कुवाडी, लिंकरोड सिग्नल, बोरिवली पश्चिम येथे ॲड. आदित्य साळवे, सिद्धार्थ , निशांत जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले. येथेही ८० रोपांचे व पिशव्यांचे वाटप करण्यात करण्यात आले .
कांदिवली पश्चिम पोईसर नगर येथे विद्यार्थी कार्यकर्ते भगवान मिश्रा आणि त्यांचे सहकारी रोपांचे वाटप करण्यात आले . तर मालाड पूर्व, तानाजी नगर येथे उपाध्यक्ष केतन शहा आणि त्यांचे सहकारी १०० रोपांचे तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले .
याशिवाय दक्षिण मुंबई जिल्ह्यात भायखळा लवलेन, बी आय टी चाळ बुद्धविहार येथे पंकज कांबळे, दीपक वागळे आणि त्यांचे सहकारी १०० हून अधिक तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
युवा जनता दलातर्फे लवकरच उत्तर मुंबई जिल्हा मतदारसंघातील गरीब वस्त्या, बुद्धविहार, मंदिरे अशा ठिकाणी निर्जंतुकीकरणाची मोहीमही राबविण्यात येणार आहे.